DAILY CURRENT AFFAIRS ||10 JANUARY 2023 CURRENT AFFAIRS ||चालू घडामोडी 2023||


DAILY CURRENT AFFAIRS ||10 JANUARY 2023 CURRENT AFFAIRS ||चालू घडामोडी 2023||




नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी घेऊन येत आहेत चालू घडामोडी (current affairs)ची नवीन सिरीज ज्यामध्ये चालू महिन्यांमधील महत्त्वाच्या घडामोडींचा  परीक्षाभिमुख आढावा घेण्यात येईल. सदर माहिती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी एमपीएससी,यूपीएससी, बँकिंग (Mpsc, Upsc, Banking etc.) इत्यादीसाठी उपयुक्त ठरेल. 


●विश्व हिंदी दिवस-

विश्व हिंदी दिवस- आज 10 जानेवारी विश्व हिंदी दिवस -संपूर्ण देशामध्ये साजरा केला जात आहे.

 1) याच दिवशी 1975 मध्ये म्हणजेच 10 जानेवारी 1975  नागपूर येथे पहिली विश्व  हिंदी  संमेलन       भरविण्यात आले होते.
2) यावर्षीच्या विश्व हिंदी संमेलनाची ही बारावी (12)आवृत्ती आहे व ती फिजी या ठिकाणी पार            पडली जाणार आहे.

3) हिंदी ही जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे. 
   

4)या वर्षाची थीम आहे, 

  "हिंदी को जन्मत की भाषा बनाना, बगेर उनकी मातृभाषा की  महत्ता को भुले".
( विश्व हिंदी दिवसानिमित्त आपण थीम हिंदीमध्येच लक्षात ठेवूया.)
Theme - "हिंदी को जन्मत की भाषा बनाना, बगेर उनकी मातृभाषा की  महत्ता को भुले|"
 5) आपल्या राज्यघटनेतही भाषा संबंधित काही तरतुदी दिलेले आहेत त्यांचा थोडक्यात आढावा घेऊ.

1)कलम 343= संघराज्याची अधिकृत भाषा.
2)कलम 350 (A)= प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून  शिक्षणाची सोय.
3) कलम  351= हिंदी भाषेचे विकासासाठी मार्गदर्शक तत्वे.


 ● निधन वार्ता-

रहमान राही 9 जानेवारी 2023, प्रसिद्ध कवी तसेच जम्मू-काश्मीरचे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रहमान रही यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. 

■ ज्ञानपीठ प्राप्त साहित्य= काव्यसंग्रह-Syah Rud Jaren Manj (In Black drizzle)

                                                       2004 साठीच ज्ञानपीठ 2007 मध्ये देण्यात आला.

■ ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना- 1961

■पहिला ज्ञानपीठ- जी. शंकर  कुरूप

■ हिंदी भाषेतील पहिले ज्ञानपीठ - सुमित्रानंदन पंत

 ■2021 चा ज्ञानपीठ - दामोदर मौजो



● राष्ट्रीय युवा महोत्सव -

(National Youth Festival Organise in Hubali, Karnataka )

■ 12 ते 16 जानेवारी 2023 दरम्यान 26 वा राष्ट्रीय युवा महोत्सव कर्नाटकातील हुबळी या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. 

■ Theme- Developed Youth, Developed India .

थीम- विकसित युवा विकसित भारत 

यामध्ये पारंपरिक खेळ प्रदर्शित केले जातील - कलरी पायट्टू(kalaripayattu),थांगटा (Thangta), गटका (Gatka) ,मल्लखांब, योगासने इत्यादी प्रकारचे खेळ प्रदर्शित केले जातील.

 

● Sovereign Green Bond-

RBI issued Sovereign Green Bond

■ आरबीआय Sovereign Green Bond प्रसृत करेल, वित्त मंत्रालयाच्या घोषणेनुसार आरबीआय 16000 करोड रुपयांचे सुवरीन ग्रीन बॉण्ड प्रसृत करणार आहे.

■ Sovereign Green Bond म्हणजे काय ?

      Sovereign Green Bond म्हणजे केंद्र किंवा राज्य सरकार द्वारा प्रसिद्ध डेट इन्स्ट्रुमेंट (debt. Instrument) असतात ज्याचा वापर गुंतवणूकदारांकडून एक प्रकारे पैसा उधार घेण्यासाठी केला जातो.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.